सुरकुत्या येण्यामागची कारणं कोणती? सूर्याच्या अतितीव्र किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊन रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या येतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय उन्हात जाताना सनस्क्रीन लोशन, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल, खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात कोरफडीचा गर घालून तयार केलेल्या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा. निसर्गोपचारांनी सुरकुत्या कशा कमी कराव्यात? त्वचेचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्वचेवर कमीतकमी केमिकल्स आणि मेकअपचा वापर करावा. त्वचेतील कोलायजन वाढण्यासाठी संतुलित आहारा घ्यावा. आहारामध्ये मासे, चिकन, गाजर, दही, अंडी यांचा समावेश करावा.