१

योग्य वेळेची वाट पाहात बसू नका, कामाला सुरूवात करा योग्य वेळ सुरू होईल.

२

ग्राहकाला जर तुम्ही खूश ठेवू शकलात तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल.

३

मोठा उद्योजक व्हायचं असेल तर सतत काहीतरी नवीन शोध घेतला पाहिजे.

४

व्यवसायात नवीन आव्हाने घ्यायला तयार राहिले पाहिजे.

५

तुम्ही नोकरी सोबत छोटासा व्यवसाय करत असाल आणि तो चांगला चालत आहे तर व्यवसायात उतरा.

६

व्यवसाय करण्यासाठी कोणतीही गोष्ट बाजारात विकता आली पाहिजे.

७

तुमच्या व्यवसायातील भांडवल किंवा व्यवसाय कसा वाढवायचा असा सारासार विचार करून तुम्ही व्यवसायात उडी घ्यायला हरकत नाही.

८

स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि सतत अभ्यास करत रहा.

९

सर्वांपेक्षा आपल्यात वेगळे काय आहे याचा शोध घ्या आणि आपल्यावर काम करा, याचा फायदा व्यवसायात नक्कीच होतो.

१०

व्यवसाय करताना पर्यायी मार्ग नेहमी ठेवा.