धणे पावडर ही रोजच्या स्वयंपाकाला लागतेच.



धणे पावडर ही सर्व मसाल्यांप्रमाणे बाजारातूनच आणली जाते.



पण धने पावडर ही घरच्या घरी सहजपणे तयार करता येते.



घरी तयार केलेली धणे पावडर ही भेसळविरहित असते.



धणे विकत आणावेत ते आधी निवडून घ्यावेत.



धणे एक ते दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवावेत.



धणे एक दोन दिवस उन्हात पूर्ण सुकवावेत



धणे सुकल्यानंतर भाजून घ्यावेत.



थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पूड होईपर्यंत वाटावेत.



10 मिनिटात धणे पावडर तयार होते.