मोबाईल पाण्यातून काढल्या काढल्या बटणं दाबून तो चालतोय का ते पाहण्याचा मोह टाळा.
मोबाईल भिजल्यानंतर सिमकार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा.
जर मोबाईलची बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर ती बाजूला काढून बाजूला ठेवा.
कोरड्या कपड्याने किंवा कागदी नॅपकिनने मोबाईल पुसून घ्या.
ओल्या मोबाईलवर ब्लो ड्रायर वापरु नका.
मोबाईल पूर्णपणे सुकल्याशिवाय सिमकार्ड , मेमरी कार्ड टाकू नका.
मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका.
मोबाईल भिजल्याने बंद पडल्यास एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात मोबाईल बु़डबून ठेवा.
मोबाईल भिजल्याने तांदूळ मोबाइल मधील पाणी शोषून घेतो.
मोबाईल झिप लॉकच्या बॅगमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत सिलिका जेलची पुडी ठेवून बॅग सील करा.