चष्मा स्वच्छ करताना कमीतकमी दबाव टाकावा.

चष्मा नाकावर घसरत असेल तर, तो एका जागी टिकून राहावा म्हणून तुम्ही Wedgees वापरू शकता.

बॉक्समध्ये चष्मा ठेवताना पण काच खाली नसेल याची काळजी घ्या कारण काच जर खाली असेल तर ओरखडा पडण्याची शक्यता असते.

आपल्या चष्म्याला उष्ण जागी ठेवू नका, चष्म्याची काच बनवण्यासाठी हल्ली प्लास्टिक वापरलं जातं हे प्लास्टिक उष्ण जागेत राहिल्यास विरघळू शकतं.

चष्मा साफ करण्यासाठी क्लीनरचा वापर करा.

नेहमी चष्मा दोन्ही हातांनी काढा कारण एका हाताने चष्मा काढल्यास फ्रेम हलू शकते आणि ती तुमच्या चेहऱ्यावर नीट बसणार नाही.

अधूनमधून तुम्ही बाहेरून आल्यावर चष्मा सॅनिटाइज करणं गरजेचं आहे.

चष्मा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं, जास्त गरम पाण्याचा वापर करू नये यामुळे लेन्सवरील कोटिंग खराब होवू शकते.

चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचे काही थेंब बोटांवर घेऊन हलक्या हाताने लेन्स स्वच्छ करा.

मायक्रोफायबर कापड हे लिंट फ्री असते, त्यामुळे चष्मा पुसताना लेन्सवर स्क्रॅचच्या खुणा उमटत नाहीत.