घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे.पहाटेपासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले.

अनेक दिवसापासून बंद असलेली मंदिरे उघडल्याने भाविकांनी दर्शनासाठी तुरळक प्रमाणात गर्दी केली आहे.

मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.