बिग बॉस मराठी फेस निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची खूप चर्चा झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही निक्कीने मान्य केलं होतं की, तिच्या आणि अरबाजमध्ये मैत्रीच्या पुढे काहीतरी आहे. तेव्हापासून निक्की आणि अरबाज हे रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा सुरु झाल्या. मात्र, दोघांनीही याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. अलिकडेच निक्की तांबोळी मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. निक्कीने पापाराझी समोर येऊन पोझ दिल्या. यावेळी पापाराझींनी निक्की आणि अरबाजच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताच, निक्कीने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पापाराझींनी तिला विचारलं की, निक्की तू लग्न कधी करणार? अरबाजसोबत लग्न कधी करणार हा प्रश्न विचारताच, निक्कीने काय? असं म्हटलं. तुम्ही लग्न कधी करणार? असं विचारताच निक्कीने आश्चर्याने काय? असं विचारलं. यावर उत्तर देताना निक्कीने पापाराझींना उलट प्रश्न करत विचारलं की, तुम्हाला एकच प्रश्न मिळतो का मला विचारायला? पुढे पापाराझी म्हणाले की तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता. यावर निक्कीने धन्यवाद म्हणत आभार व्यक्त केले.