सर्वाधिक नेटवर्थ...

श्वेता तिवारी टेलिव्हिजनची टॉप अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ती ओळखली जाते.

Published by: जगदीश ढोले

दोन मुलांची सिंगल पेरेंट

श्वेता आपली दोन मुलं पलक तिवारी आणि रेयांश कोहलीसोबत राहते. ती एकट्यानंच दोन्ही मुलांचा सांभाळ करते.

दोन लग्न मोडलीत

श्वेता तिवारीनं आयुष्यात खूप वाईट काळ पाहिलाय... तिनं आपल्या आयुष्यात दोनदा लग्न केलं आणि दोन्ही वेळेला काडीमोड घेतलाय.

घरगुती हिंसेची शिकार...

श्वेता तिवारीच्या दोन्ही लग्नांमध्ये ती घरगुती हिंसेची शिकार झाली होती. तिचे पती तिला मारहाण करायचे, याचा खुलासा खुद्द श्वेतानं केला होता.

मुलांना दुःख सहन करण्याची सवय

श्वेतानं एका मुलाखतीत बोलताना सांगिलतेलं की, माझ्या दोन्ही मुलांमध्ये दुःख सोसण्याची शक्ती आहे. ते कधीच काही बोलत नाहीत...

6 वर्षांची होती मुलगी...

आपली मुलगी पलक तिवारीबाबत बोलताना ती म्हणालेली की, माझी मुलगी 6 वर्षांची होती, जेव्हा तिनं मला नवऱ्याकडून मार खाताना, शिव्या खाताना पाहिलं आहे.

मुलानंही सगळं काही पाहिलंय...

ती म्हणाली की, त्यानं पोलिसांना घरी येताना पाहिलंय. आईलाही पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाताना पाहिलंय...

मुलीबाबत अनेक प्रश्न करतात उपस्थित...

अनेकजण मला खूप वाईट-साईट बोलतात. ते म्हणात की, तू दोनदा लग्न केलंयस, आता तुझी मुलगी पाच वेळा लग्न करणार...

मुलगी लग्न करणार नाही...

ती म्हणाली की, मला असं वाटतं की, माझी मुलगी लग्नच करणार नाही. कारण तिनं जेवढं पाहिलंय, ते पाहून ती लग्नाचा निर्णय घेणारच नाही.