लग्नाच्या 6 वर्षानंतर प्रिन्स नरुला-युविका चौधरीच्या नात्यात दुरावा? प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल सध्या चर्चेत आहे. मुलीच्या जन्माची गूड न्यूज दिल्यानंतर प्रिन्स-युविकाच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जेव्हा प्रिन्सने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितलं की, मुलीची प्रसूती झाल्याचं त्याला युविकाने सांगितलं नव्हतं, कारण तो त्यावेळी शूटींगसाठा बाहेर होता. त्यावेळी प्रिन्स पुण्यात शूटिंग करत होता. त्यामुळे त्याला इतर कुणाकडून याची माहिती मिळाली आणि तो मुंबईत परतला. याशिवाय युविका प्रिन्सच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजर राहिली नव्हती, त्यामुळे या अफवांना आणखी पेव फुटला. 24 नोव्हेंबरला प्रिन्सने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तो मुलीसोबत पोज देताना दिसत आहे, पण फोटोंमध्ये युविका दिसली नाही. दोघेही सध्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत बाळाचं संगोपन करत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या पोस्ट शेअर करत आहेत. सध्या हे कपल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या अफवा व्हायरल होत आहेत.