प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लवकरच गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे. दिव्यांका आणि विवेक अलिकडेच एका दिवाळी पार्टीत पोहोचले होते. यावेळी मीडियासमोर पोझ देताना दिव्यांकाने सर्वांचं लक्ष वेधलं. दिवाळी पार्टीमध्ये दिव्यांका त्रिपाठी ग्रीन कलरच्या सलवार सूटमध्ये तर विवेक मरुन कुर्त्यामध्ये दिसला. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देत असताना विवेक दिव्यांकाचे केस नीट करताना दिसला, यावेळी दिव्यांका ओढणीने पोट लपवताना दिसली. यामुळेच दिव्यांका लवकरच गूड न्यूज देणार असून हे स्टार कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत, अशी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. दिव्यांकाच्या प्रेग्नेंसीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून सध्या या केवळ अफवा आहेत. ही गूड न्यूज व्हायरल होत असल्याचे त्यांचे चाहते मात्र खूप खूश आहेत.