बिग बॉस सीझन 18 चा प्रवास संपला आहे.

104 दिवसांच्या प्रवासानंतर यंदाच्या सीझनचा विजेता मिळाला आहे.

अभिनेता करणवीर मेहरा याने बिग बॉस सीझन 18 जिंकल आहे.

करणवीर मेहराने बिग बॉस 18 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मीडियासमोर येऊन एकापेक्षा एक पोझ दिल्या.

बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारीला पार पडला.

बिग बॉस 18 विजेत्या करणवीर मेहराला बिग बॉस 18 च्या ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे.

बिग बॉस जिंकल्यानंतर करणवीर मेहरा आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

ग्रँड फिनालेनंतर करण बिग बॉसच्या घराबाहेर आला आणि त्याने त्याची ट्रॉफी दाखवली.

करणवीर मेहराचा प्रवास अद्भुत राहिला.

करणने बिग बॉसच्या घरात खूप भांडणे केली. अगदी विवियनपासून अविनाशपर्यंत तो प्रत्येक स्पर्धकाशी भांडताना दिसला आहे.

अखेर करणवीर मेहराने 'खतरों के खिलाडी' नंतर बिग बॉस सीझन 18 ची ट्रॉफी जिंकली.