सर्वांची लाडकी 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणे , दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, लहानपणी शाळेत दिवाळीची सुट्टी मिळायची आणि त्यासोबत सुट्टीचा गृहपाठ ही मिळायचा.
abp live

सर्वांची लाडकी 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणे , दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, लहानपणी शाळेत दिवाळीची सुट्टी मिळायची आणि त्यासोबत सुट्टीचा गृहपाठ ही मिळायचा.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: ZEE Marathi
abp live

मला सर्वात जास्त गंमत तो गृहपाठ सुट्टीच्या पहिल्याच दिवशी पूर्ण करण्यात होती.

Image Source: ZEE Marathi
abp live

मी कधीही अभ्यासात मागे नव्हते. माझं असं असायचं कि कधी सुट्टी पडतेय आणि भरपूर गृहपाठ मिळतोय आणि मी तो त्याच दिवशी घरी जाऊन पूर्ण करतेय याची मला घाई लागलेली असायची.

Image Source: ZEE Marathi
abp live

ही आठवण माझ्या सर्वात जवळची आहे. गृहपाठ पूर्ण केल्यावर बाकीचे दिवस शॉपिंग करायची मनासारख्या कपड्यांची, मज्जा करायची.

Image Source: ZEE Marathi
abp live

दिवाळीच्या दिवशी पहाटे ४-५ वाजता उठायचं, नवीन कपडे घालायचे, आई- मोठी बहीण दारात रांगोळी काढायच्या.

Image Source: ZEE Marathi
abp live

मग एक फेरफटका मारायचो शेजाऱ्यांच्या रांगोळ्या आणि तोरण बघण्यासाठी. मला पहिली पहाट, अभ्यंगस्नानाचा मला प्रचंड आवड कारण एक वेगळीच ऊर्जा असायची.

Image Source: ZEE Marathi
abp live

मी दिवाळीच्या तुडतुडी या फटाक्यासारखी आहे असं मला वाटतं. तुडतुडी कशी पेटल्यावर तुडतुड आवाज येतो आणि छान रंग येतात तशीच मी आहे. जीवाला बिलकुल शांतता नसते.

Image Source: ZEE Marathi
abp live

तशी मी गप्प असते पण जर कुठची गोष्ट हातात घेतली तर ती मी पूर्ण केल्या शिवाय शांत बसूच शकत नाही. दिवाळीत जे चटपटीत आणि तिखट पदार्थ आहेत मी त्यांच्यासारखी आहे.

Image Source: ZEE Marathi
abp live

म्हणजे तिखट शेव , मक्याचा आणि पोह्याचा झणझणीत चिवड्या सारखी . दिसायला आणि स्वभावाने जरीही मी लाडवा सारखी गोड असेन पण माझा मूळ स्वभाव तिखट शेवे सारखा आहे.

Image Source: ZEE Marathi