'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीने बाप्पा सोबतचे गोड फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील सिद्धार्थ म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशीने आपल्या घरी बाप्पाचं दिमाखात स्वागत केलं आहे.
'फुलपाखरू', 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
आदेश बांदेकरांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
सायली संजीवच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेता निखिल राऊतनेदेखील गपणती बाप्पाचं दिमाखात स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर त्याने बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
'तू तेव्हा तशी' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
'बिग बॉस मराठी' आणि 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळालेल्या मायरा वायकुळच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे.