दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.
सध्या नयनतारा आणि विघ्नेश हे स्पेनमध्ये हनीमून साजरा करत आहेत. पण हनीमूनसाठी त्यांनी एकही रुपया खर्च केलेला नाही.
नयनतारा आणि विग्नेश यांच्या हनीमूनचा खर्च कोण करत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल? जाणून घेऊयात त्याबद्दल
नयनतारा आणि विघ्नेश हे ज्या हॉटेलमध्ये राहात आहे त्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सुमारे अडीच लाख रुपये आहे.
नयनतारा आणि विघ्नेश हे एकही रुपया खर्च न करताना त्यांचा हनीमून साजरा करणार आहेत.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंपनीनं नयनतारा आणि विघ्नेश यांच्या हनीमूनला स्पॉन्सर केलं आहे.
नयनतारा आणि विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
डॉक्युमेंट्री प्रमोट करण्यासाठी नेटफ्लिक्सनं नयनतारा आणि विग्नेश यांच्या हनीमूनला स्पॉन्सर केलं आहे.
नयनतारा आणि विघ्नेश हे स्पेनमधील त्यांचे रोमँटिक पोजमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
30 सप्टेंबर रोजी नयनतारा आणि विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.