अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. ती विविध पोजमध्ये फोटो पोस्ट करत असते. कधी वेस्टर्न तर कधी ट्रे़डीशनल कपड्यांमध्ये रुबिना फोटो पोस्ट करते. नुकतेच तिने एका स्पेशल प्रकारच्या साडीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या अदा अगदी दिलखेचक आहेत. रुबिनाने 2006 मध्ये ‘मिस शिमला’ स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली होती. रुबिनाला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने 'छोटी बहू' या टीव्ही मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. रुबिना दिलैकने 2008 मध्ये टीव्ही सीरियल ‘छोटी बहू’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. रुबिनाला आयएएस व्हायचं होतं आणि त्यासाठी ती तयारी करत होती. पण, याच दरम्यान ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. या टेलिव्हिजन सीरियलमध्ये ती राधिकाच्या भूमिकेत दिसली होती.