तेजश्री प्रधानने बाप्पासोबत खास फोटो शूट केलं असून ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बाप्पाचं खास स्वागत केलं आहे. फुलांची आकर्षक सजावट केलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या आजीचे निधन झाल्याने तिच्या घरी यंदा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं नाही. पण तिने बाप्पा सोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वीणा जगतापनेदेखील बाप्पाचं दिमाखात स्वागत केलं आहे. सई लोकुरने बाप्पासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस फेम मेघा धाडेच्या घरी गणपती बाप्पाचं आमगन झालं आहे. अभिनेत्री प्रिया बापटच्या घरीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मृणमयी देशपांडेच्या घरी बाप्पाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं असून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. चंद्रमुखी अमृता खानविलकरच्या घरी चंद्रावर गणू विराजमान झाला आहे. संस्कृती बालगुडेच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.