पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. टिव्ही आणि पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवल्यानंतर सरगुन आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. सरगुनला बॉलिवूड चित्रपटांसाठी याआधीही अनेक ऑफर आल्या आहेत. पण सरगुन चांगली संधी मिळण्याची वाट बघत होती. सरगुन मेहता लवकरच 'मिशन सिंड्रेला' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सरगुनने 2009 साली अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरील '12/24 करोल बाग' या मालिकेपासून केली होती. नुकतेच तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती फार सुंदर दिसत आहे. 'मिशन सिंड्रेला' चित्रपटामध्ये सरगुन मेहता खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम) (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)