टीव्ही होस्ट आणि कॉमेडी क्वीन भारती सिंह आजकाल तिच्या मुलासोबत खूप वेळ घालवत आहे आणि खूप मस्ती करत आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीने मुलाला जन्म दिला. नुकताच तिनेआपल्या मुलाचा चेहरा चाहत्यांसमोर उघड केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या मुलाच्या फोटोसोबतच अभिनेत्रीने मुलाचे नाव लक्ष असल्याचेही सांगितले आहे. आता कॉमेडियनने पुन्हा आपल्या मुलाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याचा मुलगा खूपच क्यूट दिसत आहे. भारती सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर लक्षचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा मुलगा हॅरी पॉटर लूकमध्ये दिसत आहे. हातात काठी आणि पिवळी शाल गुंडाळलेला लक्ष खूप गोंडस दिसत आहे. भारती आणि हर्षच्या मुलाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही लक्षच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. फोटोंवर आतपर्यंत 50 हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य:bharti.laughterqueen/इन्टाग्राम) (फोटो सौजन्य:bharti.laughterqueen/इन्टाग्राम)