दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुननं त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवली.



आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.



बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुन कधी काम करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आता एका मुलाखतीमघ्ये याबाबत अल्लू अर्जुननं माहिती दिली.



मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुन म्हणाला,'हिंदी चित्रपटात काम करणे हे एखादा टास्क करण्यासारखं आहे. कारण हे काम मला खूप अवघड वाटतं. माझ्यासाठी हे खूप अवघड टास्क आहे.'



' योग्य वेळ अली आणि संधी मिळाली तर मी नक्की हिंदी चित्रपटांमध्ये काम करेल. ', असं अल्लू अर्जुन म्हणाला.



तो पुढे म्हणाला, 'हिंदी चित्रपटामध्ये काम करणं हे सध्या माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर आहे. पण गरज पडली तर मी या कंफर्ट झोनच्या बाहेर येईल.'



पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये जगभरात रिलीज झाला होता.



रिपोर्टनुसार, ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.



‘पुष्पा: द रूल’ चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरु होणार आहे.



पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.