तेजस्विनीचा रेड साडी लूक व्हायरल... मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय. तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. तेजस्विनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिज लवकर येते, त्याच्या प्रोमोशन साठी तिने एक खास लूक केलाय. (Photo:@tejaswini_pandit/IG)