अवघा रंग एक झाला... मोक्षदा एकादशी निमित्त विठुरायाच्या मंदिराला आकर्षक सजावट आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात, मोक्षदा एकादशी. मोक्षदा एकादशी असल्यानं विठ्ठल मंदिराला अतिशय आकर्षक आशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचूनदकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोलाखांबी येथे ही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठुरायाची राऊळी सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, कामिनी आणि शेवंतीची फुलांचा वापर करण्यात आला आहे. फुलांच्या या मनमोहक सजवटीमुळे विठ्ठल मंदिर खुलून दिसत आहे. (Photo : @PandharpurVR/Twitter)