'बिग बॉस 15' संपताच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता 'नागिन 6' मध्ये दिसणार आहे.



तेजस्वी तिच्या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. आतापर्यंत आलेल्या प्रोमोजमध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती.



आता तेजस्वीने तिचे काही ‘नागिन’ लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश 'नागिन' ड्रेस अपमध्ये दिसत आहे. तिने गोल्डन कलरचा बिकिनी टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.



तेजस्वीने नाकात छोटी नथणी घातली, असून केस मोकळे सोडले आहेत. कॅमेऱ्याकडे बघून ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहे.



शोमधील तेजस्वीच्या पात्राचे नाव ‘प्रथा’ असणार आहे. तिच्यासोबत 'बिग बॉस 15' चा आणखी एक स्पर्धक सिंबा नागपाल देखील या मालिकेत झळकणार आहे.