रश्मिका मंदान्नाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने हा किस्सा शेअर केला आहे. यासोबतच तिने या संपूर्ण प्रकाराशी संबंधित चाहत्यांच्या प्रतिक्रीयाही शेअर केल्या आहेत. मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना रश्मिका म्हणाली की, चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्यानंतर मी हुल्लडबाजी करणे थांबवत नाही. माझ्या चित्रपटासाठी नाही, पण मला एखादा चित्रपट आवडला तर मी शिट्टी वाजवते. एवढंच नाही तर थिएटरमध्येच डान्ससुद्धा करते. परंतु, त्यावेळी जर कोणी मला ओळखलं तर मला वाटतं आता येथून निघून जावं. रश्मिका तिच्या या बालिशपणाबाबत सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. रश्मिकाच्या या क्युट स्टाईलवर चाहते जीव ओवाळून टाकतात. तिचा गोंडस लूक लोकांना वेड लावायला पुरेसा आहे, असे चाहते म्हणतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता खूपच वाढवली आहे. आधी रश्मिकाचा डंका फक्त दक्षिणेतच होता, तो आता बॉलिवूडमध्येही वाजत आहे.