बंगळुरु येथे सुरु असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोल लागत आहे. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर आजच्या दिवसातील सर्वात महागडा खेळाडू श्रेयस अय्यर ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने आपेक्षाप्रमाणे ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर आजच्या दिवसातील सर्वात महागडा खेळाडू श्रेयस अय्यर ठरला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लागली होती. ईशान किशनवर मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावली आहे.