तुम्ही काही ठिकाणी सुरक्षेसह रोबोटला काम करताना पाहिलं असेल. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
पण, तुम्ही कधी रोबोटला केस कापताना बघितला आहे का?
आम्ही तुम्हाला असा रोबोट दाखवणार आहोत, ज्याने माणसाचे केस कापले.
रोबोटने कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने व्यक्तीचे केस कापले आहेत. इंजिनियरने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
रोबोटने इंजिनियरचा उत्तम हेअर कट केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही केस खाली न पाडता.
AI रोबोटने इंजिनियरचा हेअर कट केला. यादरम्यान व्यक्तीला कोणतीही इजा झाली आणि त्याला नवा हेअर कटही आवडला.
AI रोबोटच्या हेअर कटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या AI रोबोमध्ये एक वॅक्यूम सिस्टिम आहे, जे कापलेले केस खाली पडू न देता खेचून घेतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने यामध्ये तुम्हील तुमच्या पसंतीनुसार केसाची लांबी आणि डिझाइन ठरवू शकता.
हा रोबोट कोव्हिडच्या काळात बनवण्यात आला होता. हा व्हिडीओ Stuff Made Here नावाच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे.
AI रोबो माणसाच्या तुलनेत केस कापायला जास्त वेळ घेतो आणि याचा परिणाम सरासरी आहे.
कोव्हिडच्या काळात सर्व सलून बंद असल्यामुळे एका युवकाने हा रोबो तयार केला होता.