उद्योगपती एलॉन मस्क हे नाव भारतात चर्चेत आले ते ट्विटरच्या विक्रीनंतर, कारण एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं अन् भारतीय नेटीझन्सच्या घरापर्यंत हे नाव पोहोचलं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Twitter/ tesla

मात्र, एलॉन मस्क जगातील गर्भश्रीमंत आणि पहिल्या 5 श्रीमंतांच्या यादीत असलेलं नाव आहे.

Image Source: Twitter/ tesla

टेस्ला या अफलातून अलिशान कार कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत.

Image Source: Twitter/ tesla

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारने आता रोबोटॅक्सीचं लाँचिंग केलंय. विशेष म्हणजे एलॉन मस्क यांनी स्वत: या कारची सफर केली असून ही कार मानविहरीत असून ऑटोमॅटीक ड्राईव्ह करणारी कार आहे.

Image Source: Twitter/ tesla

रोबोटॅक्सी या नावातच ही कार रोबोद्वारे ऑपरेट होणारी, चालणारी कार असल्याचं लक्षात येतं,

Image Source: Twitter/ tesla

लॉस एंजिलिस येथील टेस्लाच्या रोबो इव्हेंटनंतर या कारचा व्हिडिओ आणि फोटो माध्यमातून समोर आले आहेत.

Image Source: Twitter/ tesla

येथील कार्यक्रमात बोलताना, 2026 साली रोबोटॅक्सीचं प्रोडक्शन सुरू केलं जाईल, असं एलॉन मस्क यांनी सांगितलं.

Image Source: Twitter/ tesla

विशेष म्हणजे या कार्यक्रमातून रोबोबसची झलकही जगाला दाखवण्यात आलीय.

Image Source: Twitter/ tesla

या बसमधून एकावेळी 20 जण प्रवास करु शकतात.

Image Source: Twitter/ tesla

रोबोटॅक्सीमध्ये दोन जणांच्या बसण्याची व्यवस्था असू्न अतिशय अलिशान अशी ही ड्रायव्हरविरहित कार आहे.

Image Source: Twitter/ tesla

सध्या केवेळ प्रोटोटाईप म्हणून नव्या डिझाईनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे.

Image Source: Twitter/ tesla

रोबो टॅक्सीला मोबाईल फोनप्रमाणे वायरलेस चार्जरद्वारे चार्जिंक केलं जाऊ शकेल,

Image Source: Twitter/ tesla

या कारचे दरवाजेही ऑटोमॅटीक असून ते उघडण्यासाठी कुठल्याही मानवाची गरज नाही.

Image Source: Twitter/ tesla

एलॉन मस्क यांनी या कारसह मीडियाला पोझ देऊन कारमध्ये बसून प्रवास केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Image Source: Twitter/ tesla