9 सप्टेंबर 2024 रोजी Apple कंपनीनं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अॅन्युअल इव्हेंट आयोजित केलेला.
Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
अॅन्युअल इव्हेंटमझ्ये अॅपलनं 16 सीरिज लॉन्च केली.
बऱ्याच काळापासून जगभरातील युजर्स आतुरतेनं वाट पाहत होते.
अॅपलनं यंदाच्या वर्षात आपल्या नव्या आयफोन सीरिजमध्ये 4 आयफोन्स लॉन्च केलेत.
यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चा समावेश आहे.
अॅपलनं आपल्या नव्या सीरिजमध्ये मोठी स्क्रिन, A18 आणि A18 Pro चिपसेट, iOS 18, अॅपल इंटलिजन्स आणि उत्तम कॅमेरा क्वॉलिटीसह अनेक खास फिचर्स सहभागी करण्यात आले आहेत.
भारतात iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.
तर iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपये आहे.
पण तुम्हाला iPhone 16 सीरिजची पाकिस्तानातील किंमत माहीत आहे का?
iPhone 16 कंपनीनं 999 डॉलर्समध्ये लॉन्च केला आहे. याची पाकिस्तानातील किंमत PKR 2,78, 000 मध्ये मिळेल.
तर iPhone 16 Pro Max ची किंमत पाकिस्तानात PKR 3,34,000 आहे.
iPhone 16 सीरिजसोबत कंपनीनं इतर अनेक प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत.
यामध्ये Apple Airpods, Apple Watch Series 10 आणि Apple Watch A देखील सहभागी आहेत.