Hide करू शकता तुमचे चॅट्स

जर तुम्हाला तुमचे WhatsApp चॅट्स इतरांपासून दूर ठेवायचे असतील, तर ही युक्ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही तुमचे चॅट्स सहज आईड करू शकता.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

तुमची प्रायव्हसी अबाधित राहील

जेव्हा तुमचा फोन इतरांच्या हातात असतो, त्यावेळी व्हॉट्सअॅप वरचं Eigene Re हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरतं. या फिचरच्या मदतीनं तुम्ही तुमची प्रायव्हसी राखू शकता.

काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

Eigene Re हे फिचर सुरू केल्यानंतर, तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या लॉक केलेल्या चॅटमध्ये कोणीही जाऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सेटिंग करणं अत्यंत सोपं

सर्वात आधी तुम्हाला WhatsAp सुरू करावं लागेल. त्यानंतर जे चॅट्स तुम्हाला हाईड करायचे आहेत, ते सिलेक्ट करावे लागतील.

अनेक पर्याय मिळतील

त्यानंतर स्क्रीनच्या टॉप-राईट कॉर्नरवर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील.

चॅट लॉकचा पर्याय मिळेल

आता तुम्हाला 'Chat Lock' चा पर्याय मिळेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पॉप अप दिसेल.

सीक्रेट कोड सेट करावा लागेल

जर तुम्ही सीक्रेट कोड सिलेक्ट केलेला नसेल, तर तुम्हाला सर्वात आधी सीक्रेट कोड सेट करावा लागेल. कोड सेट केल्यानंतर तुम्ही चॅट लॉक करू शकता.

तुमचं चॅट लॉक होईल

जसं तुम्ही एखादं चॅट सीक्रेड कोडनं लॉक कराल, त्यानंतर तुम्ही टाकलेला कोड किंवा बायोमॅट्रिकशिवाय तुम्ही चॅट ओपन करू शकणार नाही.

चॅट अनलॉकसुद्धा करू शकता

जर तुम्हाला एखादं चॅट अनलॉक करायचं असेल, तर तुम्ही 'लॉक्ड चॅट फोल्डर' मध्ये जाऊन चॅट अनलॉक करू शकता.