Netflix महागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
Netflix येत्या काळात आपल्या स्वस्त प्लान्सच्या किमतींत वाढ करणार आहे. ही वाढ यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत केली जाऊ शकते.
इंडिया टुडेच्या अहवालामध्ये, रिसर्च फर्म Jefferies च्या हवाल्यानं सांगितलंय की, लवकरच स्टँडर्ड आणि Ad-Supported प्लान्सच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
Netflix चालू वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणजेच, डिसेंबर 2024 पर्यंत प्लान्सच्या किमतींत वाढ करु सकते. यासाठी तीन कारणं सांगितली जात आहेत.
रिपोर्ट्सनुसार, Netflix ने जानेवारी 2022 मध्ये किमतींत वाढ केली होती. आता बराच काळ लोटला असल्यामुळे आता किमती वाढवण्याचा निर्णय नेटफ्लिक्सकडून घेण्यात आला आहे.
आता Netflix नवा सर्वात स्वस्त Ad-Supported प्लान लॉन्च करणार आहे. पण अद्याप नेटफ्लिक्सकडून किमतींबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह स्पोर्ट्सचाही ऑप्शन देणार आहे. रिसर्च फर्मनं सांगितलं की, प्लान्सच्या किमतींत होणाऱ्या वाढीमागे हेदेखील एक कारण आहे.
Netflix कडून अद्याप कोणतीही माहिती नाही
Netflix कडून प्लान्सच्या किमती वाढणार असल्याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Netflix भारतातही वाढवणार किमती?
Netflix भारतातही प्लान्सच्या किमतींमध्ये वाढ करणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबाबतही अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.
भारतात Netflix चे कोणते प्लान आहेत?
सध्या भारतात Netflix चे चार प्लान आहेत. ज्यामध्ये एक मोबाईल (149 रुपये) आणि टीव्हीसोबत इतर डिव्हाइसना सपोर्ट करणारा प्लान 199 रुपये आहे.