गेल्या वर्षी 12 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 सिरीज लॉन्च झाली. या आयफोन 15 आणि 15 प्लस या मॉडेल्सवर कंपनीने 10,000 रुपयांची कपात केली आहे. गेल्या वर्षी iPhone 15 ची किंमत 79,900 रुपये होती. हा फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोअरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. iPhone 15 Plus या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये होती. iPhone 16 ही नवी सिरीज आल्यानंतर या दोन्ही फोनच्या किमतीत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या. यासह या फोन्सवर 4,000 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काऊन्ट दिले जात आहे. आता iPhone 15 हा 69,900 रुपयांना मिळत आहे. सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ मिळणार आहे. तर iPhone 15 Plus या फोनसाठी आता 79,900 रुपये मोजावे लागतील.