भारतीय वेळेनुसार 8 तारखेला रात्री साधारण साडेदहा वाजता ॲपल कंपनीच्या बहुप्रतीक्षित वार्षिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Published by: abp majha web team
Image Source: apple.com

ॲपल वॉच मालिका 10 (Apple Watch Series 10), एअरपॉड्स (AirPods), आयफोन 16 सिरीज (iPhone 16 Series) सारखी अनेक उत्पादने सादर केली.

Image Source: apple.com

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंपनीने ॲपल वॉच सिरीज 10 सादर केली.

यामध्ये अनेक आरोग्य आणि फिटनेस सेन्सर उपलब्ध असतील. हे स्मार्टवॉच 30 मिनिटांत 80 टक्क्यांहून अधिक चार्ज होईल.

Image Source: apple.com

किंमत: $399 (अंदाजे रु. 33,500) आहे.
त्याचे प्री-बुकिंग आजपासून.
विक्रीसाठी - 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

घड्याळाचे रंग : नॅचरल, गोल्ड आणि डार्क स्लेट ग्रे

Image Source: apple.com

ॲपल वॉच अल्ट्रा 2 फीचर्स : नवीन फिनिशिंग आणि नवीन हर्मीस बँड.
किंमत : 799 डॉलर( अंदाजे रु . 67,074 )

ॲपल वॉच अल्ट्रा 2 कलर: नॅचरल आणि ब्लॅक

Image Source: apple.com

नवीन एअरपॉड्स 4 सादर केले. एअरपॉड्स 4 च्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. त्यांची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

द- 2 बेस व्हेरिएंटची किंमत: $129 (अंदाजे रु. 10,829) आहे.
Active Noise Cancellation मॉडेलची किंमत $179 (अंदाजे रु. 15,026 ) आहे.
ॲपल एअरपॉड्स मॅक्सची किंमत: $549 (अंदाजे रु. 46.087) आहे.

Image Source: apple.com

ॲपलने आपल्या नवीन आयफोन 16 मध्ये एक अतिशय खास फीचर जोडले आहे, ज्याला ॲपल इंटेलिजेंस म्हणतात.

तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि उत्तरे देण्यासाठी हे फिचर खूप चांगले आहे .

Image Source: apple.com

आयफोन 16 GB प्रमाणे किमत

128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत: $799 ( अंदाजे रु . 67,074 ) आहे
आयफोन 16 प्लसच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत: $899 ( अंदाजे रु. 75,469 ) आहे.

Image Source: apple.com

आयफोन 16 प्रो मध्ये 6.3 इंच डिस्प्ले आहे, तर प्रो मॅक्स मॉडेल 6.9 इंच डिस्प्लेमध्ये येईल.

हा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. यामध्ये सर्वात पातळ बेझल देण्यात आले आहेत.
हा आयफोन प्रो मॉडेल चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
हे दोन्ही मॉडेल ॲपल इंटेलिजेंस सपोर्टसह येतील.

Image Source: apple.com