भारत सरकारने तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात करत ई-पासपोर्ट सेवेची घोषणा केली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

या सुविधेमुळे प्रवाश्यांची ओळख अधिक सुरक्षित होईल.

Image Source: X

ई-पासपोर्ट दिसायला सामान्य पासपोर्टसारखाच दिसतो.

Image Source: X

ई-पासपोर्टमध्ये एक मायक्रोचिप बसवलेली असणार.

Image Source: X

या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक डिटेल्स सुरक्षितपणे सेव्ह केलेली राहील.

Image Source: X

ही माहिती एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असल्यामुळे ती फक्त अधिकृत स्कॅनिंग डिव्हाईसनेच वाचता येणार.

Image Source: X

सध्या ही सुविधा दिल्ली, नागपूर, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, रांची, शिमला, भुवनेश्वर, गोवा आणि जम्मू अशा काही निवडक शहरांमध्ये सुरू झाली आहे.

Image Source: X

विदेश मंत्रालयाचा उद्देश आहे की 2025 च्या मध्यापर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात लागू करावी.

Image Source: X

चिपमध्ये माहिती असल्यामुळे बनावट किंवा फेरफार करणे अशक्य आहे.

Image Source: X

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद होणार.

Image Source: X

ज्यांच्याकडे सध्या पारंपरिक पासपोर्ट आहे, त्यांना तात्काळ काही करण्याची गरज नाही.

Image Source: X

तो पासपोर्ट वैध असेपर्यंत वापरता येईल, मात्र नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला ई-पासपोर्ट मिळेल.

Image Source: X