बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात भारतानं 404 धावांचा डोंगर उभा केला. आधी एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावल्यवर भारत कसोटी सामना खेळत आहे. त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीच्या दृष्टीनं ही मालिका महत्वाची आहे. भारतानं सामन्याची सुरुवातही तशी दमदार केलीच आहे. कर्णधार केएल राहुल, सलामीवीर शुभमन गिल आणि कोहली स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर पंतने त्याच्या नावाला साजेशी 46 धावांची दमदार खेळी केली. पण पुजारा 90 आणि अय्यर 86 धावांवर बाद होताच, भारताचा डाव ढासळेल असे वाटत होते. ज्यानंतर कुलदीप आणि आर आश्विन यांनी डाव सावरला. भारताची धावसंख्या 404 पर्यंत नेण्यात कुलदीपनंं 40 तर आश्विननं 58 धावा केल्या. आता दुसरा दिवस संपताना बांगलादेशची धावसंख्या 133 वर 8 बाद अशी झाली आहे.