टीम इंडिया आता बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे.



दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांची ट्रॉफी आता समोर आली आहे.



दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ट्रॉफीचं अनावरण केलं आहे.



बीसीसीआयनं फोटो पोस्ट केले आहेत.



या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत



यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.



4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत.



बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर हे सर्व सामने खेळवले जातील



सध्या टीम इंडिया सामन्यांपूर्वी कसून सराव करत आहे.



विराट-रोहित हे दिग्गज मैदानावर परतणार आहेत.