बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे.



या स्पर्धेपूर्वी भारताला धक्का देणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळं आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झालाय.



भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी याबाबत माहिती दिलीय.



भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला.



या पदकासह नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली.



मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिन्याच्या विश्रांती देण्याचा सल्ला देण्यात आलाय.



महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा येत्या 28 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत खेळली जाणार आहे.



वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेतील अंतिम फेरीतील अखेरच्या प्रयत्नांत नीरज चोप्रानं यश मिळवलं.



नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 90.54 मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली.



नीरज चोप्राचं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर पडणं भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय.