वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत भारताने एकदिवसीय मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत टी20 मालिकेतही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पहिला सामना भारताने 68 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 64 धावा ठोकत अप्रतिम अर्धशतक केलं. त्यानंतर अखेरच्या काही षटकात अनुभवी दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने 41 धावा ठोकत भारताची धावसंख्या 190 पर्यंत नेली. ज्यामुळे विजयासाठी वेस्ट इंडीजसमोर 191 धावांचे आव्हान होते. पण भारताच्या गोलंदाजांनी अगदी अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडीजला अवघ्या 122 धावांवर रोखलं. यामुळे कर्णधार रोहित शर्मा याने आणखी एक विजय आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला मिळवून दिला आहे. सामन्यात फिरकीपटूंनी सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.