टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा बीसीसीआयने केली असून रोहितला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे.



उपकर्णधार म्हणून केएल राहुल संघात आहे.



पुन्हा फॉर्मात परतलेल्या विराटकडे सर्वांच्याच नजरा असतील.



सूर्यकुमार यादववर फलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी असेल.



यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघात आहे.



अष्टपैलू जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असेल.



दीपक हुडाही संघात आहे.



फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनच्या अनुभवाची संघाला मदत होईल.



अनुभवी दिनेश कार्तिकलाही संधी दिल्याचं दिसून आलं आहे.



स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला आहे.



हर्षल पटेलही दुखापतीतून सावरला आहे.



फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहलवर असेल.



युवा अर्शदीपही संघात आहे.



स्वींग किंग भुवनेश्वर कुमारही संघात आहे.



जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यावर अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.



राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आहे.



श्रेयस अय्यरही स्टँडबाय आहे.



रवी बिश्नोईही राखीवमध्ये आहे.



अनुभवी मोहम्मद शमीही राखीव खेळाडूंमध्ये आहे.