कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.



आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं शतक झळकावलं.



विशेष म्हणजे विराटचं T20 मधील हे पहिलं शतक ठरलं.



तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं हे 71वं शतक ठरलं.



या शतकासह त्याने विविध रेकॉर्डही नावावर केले



विराटनं रोहित शर्माचा टी20 मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला.



राहुलच्या 110 धावांच्या शतकी खेळीचा विक्रमही विराट कोहलीनं मोडला आहे.



विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.



त्यानं मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला आहे. मार्निट गप्टिलच्या नावावर 3500 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावर 3584 धावा झाल्या आहेत.



कोहलीनं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम केला आहे.त्यानं 33 व्यांदा 50+ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.