टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता भारत वन डे मालिकेसाठी सज्ज शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उद्या अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात मालिकेत 3 एकदिवसीय सामने होणार. पहिला सामना ऑकलंड येथे होणार आहे. दरम्यान सामन्यापूर्वी खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं पोस्ट केले सरावाचे फोटो या फोटोंमध्ये फलंदाजांसह गोलंदाजही मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. दरम्यान यावेळी संघात नेमकी कोणत्या 11 खेळाडूंना जागा मिळणार हे पाहावे लागेल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेल आणि अॅमेझॉनवर होईल.