तामिळनाडू वि. अरुणाचल प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड झाले आहेत.



तामिळनाडूच्याा सलामीवीर एन. जगदीशन याने तब्बल 277 धावा करत एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे.



लिस्ट क्रिकेटमधील ही जागतिक क्रिकेटमध्ये करण्यात आलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.



सलामीवीर जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारीही रचली.



दोघांनी मिळून तब्बल 416 धावांची विक्रमी भागीदारी केली.



तब्बल 277 धावा झळकावलेल्या एन जगदीशन याने बरेच रेकॉर्ड नावावर केले आहेत.



प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सलग पाच शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.



तो चेन्नई सुपरकिंगचा माजी खेळाडू असून नुकत्याच रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव होतं.



आता आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये सर्व संघाच्या नजरा त्याच्यावर असतील.



एन. जगदीशन हा चेन्नईकडे पुन्हा जाणार की कोणता नवीन संघ त्याला विकत घेणार हे पाहावे लागेल.