भारत-न्यूझीलंड यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार होती



पण पावसामुळे पहिला सामना रद्द झाला आहे.



सामना होणाऱ्या वेलिंग्टन येथे पाऊस सकाळपासून सुरु होता सामना सुरु होण्याची वेळ निघून गेल्यावरही पाऊस थांबला नाही.



ज्यामुळे अखेर पहिला सामना रद्द करण्यात आला.



सामना रद्द झाल्यावर सर्व खेळाडूंनी मजा-मस्ती केल्याच पाहायला मिळालं.



भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्यासाठी थेट एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली.



मैदानातील एका इनडोअर जागी दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसून आले.



चक्क खुर्च्यामध्ये ठेवून खेळाडूंनी सीमारेषा तयार केली आहे



ज्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसून आले.




आता दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.