शुभमन गिलने 52 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. के.एल राहुल आणि विराट कोहलीने 233 धावांची भागीदारी केली. राहुलने 106 चेंडूंमध्ये 111 धावांची खेळी केली. विराट कोहलीने त्याच्या वनडेमध्ये 47 वं शतक झळकावलं. विराट कोहली आणि केएल राहुलने भारताची धावसंख्या 356 वर पोहचवली. विराट कोहलीने 94 चेंडूंमध्ये 122 धावा केल्या. केएल राहुलने चौथ्या क्रमांकवर येत त्याचं दुसरं अर्थशतक केलं. हे त्याच्या वनडे करिअरमधील सहावं शतक होतं. त्यांच्या दोघांच्या भागीदारीने पाकिस्तानसमोर अधिक धावांचं आव्हान ठेवता आलं. विराट कोहलीने सर्वात वेगवान 13,000 धावांचा रेकॉर्ड केला आहे. त्याने सचिनचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.