केएल राहुल याने पाकिस्तानविरोधात दमदार शतक झळकावलं आहे.



राहुलने सहा महिन्यानंतर दमदार कमबॅक केलंय.



केएल राहुल याने 100 चेंडूत 100 धावा चोपल्या.



राहुल आणि विराट कोहली यांनी द्विशतकी भागिदारी केली.



राहुल याने पाकिस्तानच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.



पावसामुळे सामना प्रभावित झाला पण राहुल याने दमदार फलंदाजी केली.



केएल राहुल याने 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक ठोकले



श्रीलंकेत सुरु असलेला भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात राहुलची ही खेळी दमदार ठरली.



दुखापत झाल्याने पहिले दोन सामने राहुलला खेळता आले नव्हते.



पण या सामन्यामध्ये त्याने त्या दोन्ही सामन्याची कसर भरुन काढली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.