भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी टी20 गुवाहाटी येथे होणार आहे. गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. यामुळे भारतीय संघ गुवाहाटीला पोहोचला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. भारतीय संघाचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं. एअरपोर्टवर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही होते. अर्शदीप आणि दीपकने केकही कट केला. बीसीसीआयनं या सर्वाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये गुवाहाटीतील निसर्गरम्य ठिकाणं दिसत आहेत. सर्व खेळाडू अगदी रिलॅक्स दिसत आहेत.