सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून सध्या चंदीगडध्ये सरावात व्यस्त युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांच्याकडे कोचिंग घेतोय अर्जून योगराज सिंह हे स्वत:ही एक माजी क्रिकेटर आहे. त्यांनी बालपणीपासून युवराज सिंहला क्रिकेटचे धडे गिरवायला लावल्याने युवराज जगातील स्टार क्रिकेटर बनला. भारताला विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजचा मोठा वाटा होता. आता अर्जूनही योगराज यांच्याकडे क्रिकेटती कोचिंग घेताना दिसत आहे. अर्जून सोबतचे काही फोटो योगराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. अर्जून तेंडुलकर मागील दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्समध्ये आहे, पण त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. 2021 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जूननं मुंबईसाठी दोन सामने खेळले होते. आता योगराज यांच्या कोचिंगचा अर्जूनला कितपत फायदा होणार हे ही भविष्यात कळेल.