आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय.



नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणाऱ्या विराटला 'प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट' म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळालाच.



जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15व्या स्थानावर पोहोचलाय.



जवळपास तीन वर्षांपासून विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत होता.



त्यानं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराटची बॅट शांत होती.



आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात विराट कोहलीनं शतक झळकावून शतकांचा दुष्काळ संपवला.



आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं 71 शतकांचा टप्पा गाठलाय. पण टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचं पहिलंच शतक होतं.



ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहलीची भारतीय संघात निवड करण्यात झालीय.



विराट हा भारताचा आघाडीचा फलंदाज असून टी-20 विश्वचषकापूर्वी त्याचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे.



टी-20 विश्वचषकात विराट कोहली कशी कामगिरी बजावतोय? हे पाहणंं अतिशय महत्वाचं आहे.