भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपपूर्वी टी20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीला पोहोचले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाचे सराव करतानाचे फोटो नुकतेच त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत बॅडमिंटनसारखे इतरही खेळ खेळाडू खेळताना दिसताना आहेत. या फोटोंमध्ये भारताचे खेळाडू नेटमध्ये बॅटिंग सराव करत असून बोलिंगचा सरावही करत आहेत. भारताच्या प्रत्येक खेळाडूला यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रवीचंद्रन आश्विन हा ही विश्वचषकासाठी संघात असल्याने त्याच्याकडे सर्वांच्याच अपेक्षा असणार आहेत. हार्दीक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याचा हा फॉर्म वर्ल्डकपसाठीही कायम राहावा अशी आशा सर्वांनाच आहे. यावेळी फोटोंमध्ये भारताचे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल हे देखील दिसून आले आहेत. आश्विनच्या जोडीला युजवेंद्र चहल हा देखील संघात असून त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा सर्वांनाच आहे. कर्णधार रोहित शर्माही दमदार फॉर्ममध्ये आल्यास भारत नक्कीच विश्वचषक जिंकू शकतो. दीपक चाहर विश्वचषक संघात नसला तरी त्याच्याकडून या मालिकेत चांगली कामगिरी झाल्यास भविष्यातील स्पर्धांत त्याला जागा मिळू शकते.