भारत न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू जगप्रसिद्ध बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले



यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर हे क्रिकेटक दिसून आले



भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली.



तसंच बाबा महाकाल यांची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.



खासकरुन सहकारी क्रिकेटर ऋषभ पंतची प्रकृती लवकर ठीक होवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.



याआधीही श्रीलंका दौऱ्यात भारतीय खेळाडू अशाप्रकारे पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते.



खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



या दोन्हीवेळी भारतीय क्रिकेटपटू पारंपरिक पोशाखात दिसत असून त्यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे.



त्यामुळे चाहते सतत सोशल मीडियावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.



एकदिवसीय मालिकेत भारत 2-0 च्या विजयी आघाडीने पुढे आहेत.



आता तिसरा सामना उद्या अर्थात 24 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता होईल