विराट आणि रोहित सलग तिसऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग नाहीत



त्यामुळे आता टी20 क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द संपली का? अशी चर्चा होत आहे.



दोघांना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आलं नाही.



त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते.



आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर आहेत.



त्यामुळे विराट आणि रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द इथेच संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून यावर सुनील गावसकर यांनी उत्तर दिलं आहे.



अधिकाधिक तरुणांना संधी द्यायची पण त्याचा अर्थ कोहली-शर्मा कधीत खेळणार नाहीत असं गावस्कर म्हणाले



या दोघांनी 2023 मध्येही चांगली कामगिरी केल्यास 2024 च्या टी-20 विश्वचषकावेळी ते संघात नक्कीच असतील, असं ते म्हणाले



ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळवली जाणार असल्याने निवडकर्त्यांनी त्यांना विश्रांती दिली असावी, असंही ते म्हणाले



दरम्यान या प्रश्नाचं नेमकं उत्तर भविष्यातच मिळेल हे नक्की!