भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 7 विकेट्सनी विजयी झाला आहे.



या विजयासह भारतानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकलीय.  



तिसऱ्या वनडेमध्ये नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली.

ज्यानंतर भारताने अफलातून गोलंदाजी करत अवघ्या 99 धावांवर दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केलं.



यावेळी कुलदीपनं 4, सुंदर, शाहबाज आणि सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.



भारताने शुभमनच्या 49 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सनी सामना जिंकला.



दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी ,बी. फॉर्च्युन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.



याआधी मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा भारताने जिंकल्याने मालिका 1-1 अशी होती.



त्यामुळे आजचा सामना निर्णायक होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार होते.



अखेर भारताने विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली असून मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराजला गौरवण्यात आलं.